खून : साताऱ्यात पुण्यातील मटका व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून हत्या

0
176
Crime Gun
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील फुलमळा परिसरात लेक पॅलेस अपार्टमेंटच्या छतावर काल संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका मटका व्यावसायिकाची अज्ञात व्यक्तीने डोक्यात गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संजय सुभाष पाटोळे (रा. बिबवेवाडी, पुणे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काल सायंकाळी एकाची गोळी झाडून हत्या केल्याची माहिती शिरवळ पोलीसांना मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना मृतदेहाच्या जवळ आधार कार्ड सापडले असून त्यावरून मृत व्यक्ती संजय पाटोळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित व्यक्तीची अधिक माहिती घेतली असता तो पुण्यातील मटका व्यावसायिक असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी आज्ञात मारेकर्‍याचा शोध सुरू केला आहे.

मयत संजय पाटोळे यांना सध्या सातारा येथील जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. या हत्येमागील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून चाैकशी सुरू आहे. शिरवळ येथे झालेल्या या खूनामुळे परिसर हदरून गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here