वर्धा : हॅलो महाराष्ट्र – वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील विठ्ठल वार्डात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये उपचाराच्या नावाखाली तांत्रिक विद्येचा वापर करून एका 22 वर्षीय तरुणाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुरुवारी रात्री उशिरा तीन आरोपींना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण ?
मृत तरुण मानसिकरित्या अस्वस्थ असल्यामुळे त्याला उपचाराकरिता या आरोपींकडे आणण्यात आले होते. परंतु, आरोपींनी संगनमत करून त्याच्यावर तांत्रिक विद्येप्रमाणे उपचार करून त्याची गळा आवळून हत्या (Murder) केली. अब्दुल रहीम अब्दुल मजिद, अब्दुल जुनेद अब्दुल रहीम, अब्दुल जमीर अब्दुल रहीम अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. हे सगळेजण विठ्ठल वॉर्ड आर्वी येथील रहिवाशी आहेत. गणेश सोनकुसरे असे तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
गणेश तुकाराम सोनकुसरे हे अमरावती येथे राहतात. त्यांचा मोठा मुलगा हा मानसिक रुग्ण होता. त्यामुळे त्याला या तिन्ही आरोपींकडे उपचाराकरिता आणण्यात आले होते. परंतु, आरोपींनी संगनमत करून तरुणाचा तांत्रिक विद्येप्रमाणे उपचार करून गळा आवळून खून (Murder) केला. यानंतर, तरुणाचा मृतदेह पोलिसांना कोणतीही माहिती न देता दबाव टाकत वडिलांकडे सोपवत पुरावा नष्ट केला. यानंतर मृत तरुणाचे वडील गणेश सोनकुसरे यांनी अमरावती कोतवाली पोलिसात तोंडी रिपोर्ट दिली.पोलिसांनी प्रॉव्हिजनल रिपोर्टवरून गुन्हा दाखल केला तसेच आर्वी पोलिसांत माहिती देऊन तेथेही गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक बांबर्डे यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक हर्षल नगरकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान
केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन
उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब