आईशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्राची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील बोरीवली या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या आईशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्राने मित्राची मालगाडीसमोर ढकलून हत्या केली आहे. आरोपीने मृत तरुणाला रेल्वे ट्रॅकजवळ नेऊन मारहाण केली त्यानंतर त्याला समोरुन येणाऱ्या मालगाडीसमोर ढकलले. यामध्ये या पीडित तरुणाचा मृत्यू झाला आहे. गणेश नरसिंग मुखिया असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच काही तासांतच बोरीवली जीआरपी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अशोक मुखिया असे आरोपी तरुणाचे नाव आहे. मृत गणेश नरसिंग मुखिया हा महिनाभरापूर्वीच मुंबईत कामधंदा करण्यासाठी आला होता. मात्र संशयातून मित्रानेच त्याचा घात केला. बोरीवली जीआरपी पोलिसांनी या प्रकरणातील कारवाई केली आहे.

मृत व्यक्तीच्या शरीरावर आढळल्या जखमा
गुरुवारी रात्री बोरीवली ते कांदिवली दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पोलिसांना एक मृतदेह आढळून आला होता. या मृत व्यक्तीच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या होत्या. या जखमा पाहून पोलिसांना हि हत्या असल्याचा संशय आला. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. मृत तरुण हा बोरिवली ते कांदिवली दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टी भागातील रहिवासी असल्याचे तपासातुन समोर आले. यानंतर पोलिसांनी त्याच्यासोबत राहणाऱ्या मित्राला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता मृत तरुणाची ओळख पटली.

आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्राची हत्या
मृत गणेश महिनाभरापूर्वीच मुंबईत आला होता आणि आपल्या घरी राहून फ्रँकीचा व्यवसाय करत होता. यादरम्यान मृत गणेश हा आरोपी अशोकच्या आईसोबत वारंवार फोनवर बोलत असे. यामुळे गणेश आणि आपल्या आईमध्ये अनैतिक संबंध सुरु आहेत, असा संशय अशोकला आला. याच संशयातून अशोकने गणेशचा काटा काढण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे गुरुवारी आरोपी अशोक गणेशला रेल्वे ट्रॅकजवळ घेऊन गेला. त्याठिकाणी आरोपीने त्याला मारहाण केली. यानंतर त्याला मालगाडीसमोर ढकलून दिले, असे आरोपीने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपी अशोकला हत्येच्या गुन्ह्याअंतर्गत अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.