औरंगाबाद हादरले ! प्राध्यापकाची राहत्या घरात गळा चिरून हत्या; बारा तासांत शहरात दुसरे खुन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरातील एका महाविद्यालयातील प्राध्यापकांचा राहत्या घरात गळा चिरून निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना शहरातील सिडको एन 2 भागात आज पहाटे पहाटे उघडकीस आली. डॉ. राजन शिंदे असे खून झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. शहरात मागील बारा तासात झालेली ही कुणाची दुसरी घटना आहे. या घटनांमुळे औरंगाबाद शहर हादरून गेले आहे.

प्रा. शिंदे हे शहरातील मौलाना आजाद महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवतात. आज पहाटेच त्यांचे कुटुंबीय झोपेतून उठले तेव्हा प्राध्यापक शिंदे घरातील हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस पोहोचले असून, अधिक तपास सुरू आहे. विशेष म्हणजे घरातील काहीही साहित्य चोरीला गेलेले नाही. त्यामुळे कुणाच्या कारणाचा उलगडा करणे पोलिसांसमोर आव्हानच आहे.

मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात खून होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच काल रात्री शहरातील बजरंग चौकात दारूच्या कारणावरून अवघ्या तीन सेकंदात तरुणाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळीच प्राध्यापकाचा राहत्या घरात खून झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे औरंगाबाद शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Leave a Comment