आईच्या डोळ्यासमोर तलावात बुडून दोन चिमकुल्याचा मृत्यू

सांगली | जत तालुक्यातील उमराणी येथे दोघा सख्ख्या भाऊ बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सावित्री बाबुराव यादव (वय- 13 )व अभिजीत बाबुराव यादव( वय- 11) अशी पाण्यात बुडून अंत झालेल्या मुलांची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, उमराणी व सिदूर रस्त्यावर यादववस्ती जवळ कुराण पाझर तलाव आहे .या पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. या ठिकाणी कपडे धुण्यास व जनावर पाणी पाजण्यासाठी लोकांची गर्दी असते. रविवारी चार वाजण्याच्या सुमारास अभिजित व सावित्री हे दोन भावंडे आपल्या आईसोबत कपडे धुण्यासाठी गेले होते.

हे दोघे तलावातील पाण्यात खेळत होते. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय गाळात रुतला. दोघांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. काळाने त्यांचा बळी घेतला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

You might also like