पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिंपरीतील मोशी या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मैत्रीण आमच्याशी न बोलता तुझ्याशीच बोलते, म्हणून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या गुन्ह्यातील दहा आरोपींपैकी 4 आरोपी हे अल्पवयीन आहेत. कृष्णा रेळेकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अविनाश पिसे याला अटक केली आहे तर बाकी आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मैत्रीण बोलते या क्षुल्लक कारणावरून या तरुणाचा अक्षरश: दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींचा शोध घेतला असून एकाला अटक आणि इतरांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत मुलगी आपल्या एकाच मित्राकडे पाहते, त्याच्याशी बोलते, याचा इतर मित्रांना राग होता. यावरून या तरुणाचे इतरांनी अपहरण केले. त्याची दगडाने ठेचून हत्या केली.
मंगळवारी मृत कृष्णाचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत दहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यापैकी 4 आरोपी हे अल्पवयीन आहेत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.