Crime : पुण्यात भरदिवसा तरुणाचा खून; थरार CCTV कॅमऱ्यात कैद (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | शहरात भरदिवसा एका तरूणावर तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा हा खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एमआयडीसी चाकण परिसरातील म्हाळुंगे येथे कंपनीत पाणी पुरवठा करण्याच्या वादातून संबंधित तरूणाची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे. घटनेचा थरार CCTV कॅमऱ्यात कैद झाला असून पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

हत्या झालेल्या तरूणाचं नाव अतुल भोसले असं आहे. अतुल भोसले हा एका कंपनीत दोन टँकरने पाणी पुुरवठा पुरवत होता. मात्र आरोपी अक्षय शिवलेने त्याला फोन करून त्या कंपनीला पाणी मी पुरवतो असं म्हणाला. यावरून त्यांच्यात बराच वाद झाला, अशी माहिती पोलीस अधिकारी अरविंद पवार यांनी दिली.

दरम्यान, याच वादातून म्हाळुंगे येथील ममता स्वीट दुकानासमोर दुपारच्या वेळी अतुल भोसलेला गाठून त्याच्यावर अक्षय शिवले आणि त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने कोयत्याने सपासप वार केले. भर रस्त्यात अतुलवर वार होत होते, मात्र आरोपींच्या हातातील शस्त्र पाहुन कोणीही मधे पडलं नाही. वार केल्यावर आरोपी पसार झाले. अतुल भोसले हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला त्यानंतर रूग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.