गाडीत बसलेल्या पैलवानाची गोळ्या घालून हत्या; पुण्यात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | पुणे जिल्ह्यातील शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे गाडीत बसलेल्या एका युवकाची 4 गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश उर्फ तात्या सुभाष कराळे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

याप्रकरणी योगेश बाजीराव दौंडकर याच्यासह इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. चाकण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (दि.२४) रात्री सव्वानऊच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ घडली. नागेश कराळे हे आपल्या चारचाकी वाहनात बसत असताना लगतच फोर्ड फिगो वाहनात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी नागेशवर चार गोळ्या झाडल्याचे समजते.

या घटनेत नागेश गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांची मयत झाल्याचे घोषित केले. त्यांच्या डोक्यात, तोंडावर, छातीत आणि पोटात गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Comment