अकोल्यात शिवसेना उपशहरप्रमुखाची वार करून निर्घृणपणे हत्या

Vishal Kaple
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. लोक कोणत्या तरी शुल्लक कारणाचा राग मनात धरतात आणि एकमेकांच्या जीवावर (Murder) उठतात. अकोला जिल्ह्यात शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची गळा आवळून हत्या (Murder) केल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील उपशहर प्रमुखावर चाकू हल्ला (Murder) करण्यात आला आहे. विशाल कपले असे शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाचे नाव आहे. त्यांच्यावर दोन अज्ञातांनी चाकूने हल्ला (Murder) केला. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. रामदास पेठ पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे दोन्ही हल्ला करणारे आरोपी मोठी उमरी परिसरातील रहिवासी असल्याचे समजत आहे. काल संध्याकाळी अकोला शहरातील जठारपेठ भागात असलेल्या गणेश स्वीट मार्ट परिसरात विशालची हत्या (Murder) करण्यात आली. हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ विशालला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.दरम्यान, विशालच्या हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेचा अधिक तपास रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे करीत आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!