डोंबिवली : हॅलो महाराष्ट्र – डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मैत्रिणीनेच मैत्रिणीचा विश्वासघात करून खून केला आहे. मृत महिलेचे नाव विजया बावीस्कर आहे तर संशयित आरोपी महिलेचे नाव सीमा विजया असे आहे.
घटनेच्या दिवशी काय घडले ?
पाथरली येथे राहणाऱ्या सीमा खोपडे या ४० वर्षीय महिलेचे टिळक चौक येथे राहणाऱ्या विजया बावीस्कर यांच्याशी दुपारी बोलणे झाले. त्यावेळी सीमा यांनी मी घरी एकटीच आहे तर रात्री तुझ्याकडे झोपायला येते असे विजया यांना सांगितले. यानंतर विजया यांनी होकार दिल्यानंतर रात्री आरोपी सीमा विजया यांच्याकडे झोपायला आली होती. यानंतर सीमाने संधी साधून विजया यांच्या अंगावरचे दागिने चोरून त्यांचा खून केला.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस आयुक्त कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चुंबले, बाकले, धोंडे, मुंजाल यांनी केला आहे.