हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. येवला तालुक्यातील चिंचाेडी एमआयडीसी परीसरात काल रात्रीच्या सुमारास एका अफगाण सुपी सय्यद नावाच्या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीनी गाेळ्या झाडुन हत्या केल्याची घटना घडली आहे.
हत्या झालेल्या अफगाणी नागरिकाचे नाव सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती असे आहे. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती हा अफगाण धर्मगुरू असल्याची प्राथमिक माहिती असून आर्थिक वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय व्यक्त केला आहे. तर घटनेच्या दरम्यान गोळीबाराचा आवाज आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत दोघांना पकडले आहे. मात्र त्यांच्या तावडीतून चौघेजण निघून गेले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच येवला शहर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, उपनिरीक्षक मनाेहर माेरे, आदींनी घटनास्थळी तत्काळ भेट दिली. तसेच घटनास्थळाचा पंचनामाही त्यांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध केला जात आहे. चिंचोडी परिसरात रात्री उशिरा फॉरेन्सिक लॅबतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.