अबब!! चक्क 61 लाखांची मटणाची उधारी; हॉटेल चालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आत्तापर्यंत अनेक फसवणूकीच्या गोष्टी ऐकण्यात आल्या आहेत. पण तुम्ही कधी ऐकलय का की, मटणाची (Mutton) उधारी न देता हॉटेल मालकाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे ही रक्कम थोडीथोडकी नसून तब्बल 61 लाख रुपये एवढी आहे. पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेल चालकाने ही फसवणूक केली आहे. त्याच्याविरोधात पोलीस तक्रार कऱण्यात आली आहे. परंतु या प्रकरणामुळे हॉटेल व्यवसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.

पैसे न दिल्यामुळे केला गुन्हा दाखल

पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या शिवाजी मार्केट या ठिकाणी हे मटनाचे दुकान आहे. या दुकानामधून प्रसिद्ध बागबान हॉटेलचे (Bagban Hotel) मालक फजल युसुफ बागवान आणि अहते शाम आयाज बागवान या दोघांनी 61 लाखाचे मटन , चाप आणि खिमा तसेच गुर्दा हे मटनाचे प्रकार  घेतले. मात्र त्याचे पैसे दिलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यवसायिकामध्ये उडाली खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बागबान हॉटेलच्या मालकाने या विक्रेत्याकडून 2019 ते 2023 या कालावधीत दोन कोटी 91  लाख 81 हजार रुपयांचा मटण पुरवठा केला आहे. यातील बाकीचे पैसे सदर मटण वाल्याला मिळाले आहेत. परंतु उरलेले 61 लाख रुपये देण्यात हॉटेल चालकाने टाळाटाळ केल्याने अखेर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यामध्ये अनेक व्हेज आणि नॉनव्हेजचे हॉटेल्स आणि दुकानें आहेत. परंतु प्रसिद्ध अशा बागबान हॉटेल विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याने सर्व हॉटेल व्यावसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.