Mutual Fund for Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांसाठी म्युच्युअल फंड योग्य आहेत का??? अशा प्रकारे समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Fund for Senior Citizens : आपल्या भविष्यासाठी अनेक लोकं गुंतवणूक करतात. मात्र ती योग्य वयात केली तर आपल्याला मोठा नफा मिळू शकेल. तर आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या गुंतवणुकीबाबत जाणून घेणार आहोत. हे लक्षात घ्या कि, ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे त्यांचे वाढणारे वय. ज्यामुळे त्यांनी हुशारीने गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरेल. सध्या बाजारात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशातच त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे हा योग्य आणि चांगला पर्याय ठरेल. चला तर मग याद्वारे चांगला रिटर्न कसा मिळू शकेल हे जाणून घेउयात…

ज्येष्ठ नागरिकांसाठीचे म्युच्युअल फंड

सध्या, म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीची संख्या आणि NFO चे सदस्यत्व वाढतच आहे. म्युच्युअल फंडांबाबत एक गैरसमज असा आहे की, ते ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त धोकादायक असतात. मात्र सध्या असे अनेक म्युच्युअल फंड आहेत, जे खास ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा आणि कमी जोखीम लक्षात घेऊनच तयार केले गेले आहेत. Mutual Fund for Senior Citizens

Senior Citizens Tax Saving tips: How to choose right tax saving options for senior  citizens - The Economic Times

RD आणि FD मध्ये कमी रिटर्न

तसे पहिले तर आपल्याकडे फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट (RD) सारख्या अनेक पारंपारिक आर्थिक योजना देखील आहेत. मात्र सध्या या योजनांमध्ये सर्वात कमी रिटर्न मिळत आहे. इथे हे लक्षात घ्या कि, या योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर महागाईचा परिणाम होतो, ज्यामुळे यामध्ये अपेक्षेप्रमाणे चांगला रिटर्न मिळत नाही. Mutual Fund for Senior Citizens

म्युच्युअल फंड देते लवचिकता

म्युच्युअल फंडाचा उद्देश गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीमध्ये विविधता आणणे आणि स्टॉक, बॉण्ड्स, ईटीएफ आणि बाँड्स यांसारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे हा आहे. त्यामुळे बाजाराच्या कामगिरीचा यावर परिणाम होतो. हे लक्षात घ्या कि, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) किंवा एकरकमी पेमेंटद्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता येते. यामुळे गुंतवणुकीत लवचिकता आवश्यक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय ठरू शकेल. यासोबतच म्युच्युअल फंडस् मुळे ज्येष्ठ नागरिकांच्या पैशांचे महागाईच्या प्रभावापासून संरक्षण होते.Mutual Fund for Senior Citizens

How Can Senior Citizens With More Savings And Investing With Mutual Funds?  - B.K Capital Services Pvt. Ltd.

दीर्घ मुदतीत मिळेल जास्त रिटर्न

सामान्यतः ज्येष्ठ नागरिक जोखीम असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करत नाहीत. त्यांना नेहमी गॅरेंटेड रिटर्न देणाऱ्या योजनांमध्येच पैसे गुंतवायचे असतात. यामुळे ते पोस्ट ऑफिस बचत खाते, बँकांचे फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करतात. मात्र, म्युच्युअल फंडस् हे देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर ठरतील. कारण दीर्घ मुदतीत ते चांगला रिटर्न देतात.

हे लक्षात घ्या कि, म्युच्युअल फंडस् मध्ये गुंतवणूकदाराला आपली गुंतवणूक कधीही काढून घेता येते. असा पर्याय NPS किंवा इतर कोणत्याही योजनेमध्ये उपलब्ध नाही. याशिवाय म्युच्युअल फंडस् मध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सर्व मालमत्ता वर्गांमध्ये गरजेनुसार बदल करण्याची परवानगी देखील मिळते. Mutual Fund for Senior Citizens

Post Office Scheme: Open account with just Rs 1000; option to get Rs 14  lakh in 5 years | Personal Finance News | Zee News

डेट म्युच्युअल फंडामध्ये करा गुंतवणूक

ज्या ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी पहिली पाच वर्षे डेट म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवावे. यानंतर पुढील पाच वर्षांसाठी नियमित खर्चासाठी आवश्यक असलेले पैसे बॅलन्स्ड म्युच्युअल फंडामध्ये गुंतवता येतील. दहा वर्षांनंतर लागणाऱ्या पैशांसाठी लार्ज कॅप इक्विटी फंड वापरला जाऊ शकतो. मात्र रिटायरमेंटनंतर गुंतवणूक करण्यापूर्वी, एखाद्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा, जेणेकरून आपल्या गरजेनुसार कमी-जोखीम असलेल्या गुंतवणूक योजनेबाबत योग्य माहिती मिळू शकेल.

हे लक्षात घ्या कि, सध्या बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर 3% ते 7% पर्यंत व्याज दर मिळत आहेत. त्याच बरोबर सरकारने देखील अलीकडेच पोस्ट ऑफिसमधील ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेवरील व्याजदर 7.6% पर्यंत वाढवले ​​आहेत. तसेच राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूकदारांना 9% ते 12% पर्यंत व्याज मिळत आहे. Mutual Fund for Senior Citizens

Senior Citizen Saving Scheme vs Mutual Funds vs bank bonds: Which one will  make your money grow faster? Check experts' view | Zee Business

डेट फंडस् मध्ये FD पेक्षा चांगले रिटर्न

हे लक्षात घ्या कि, प्रत्येक म्युच्युअल फंडामध्ये वेगळ्या प्रकारची जोखीम असते. त्यामुळे त्यानुसारच गुंतवणूकदाराला रिटर्न दिला जातो.बाजाराशी जोडले गेले असल्याने म्युच्युअल फंडातील रिटर्न कधीही निश्चित नसतो. मात्र, याद्वारे मोठा रिटर्न मिळवण्याची खात्री वाढते. जर आपण रिटायर झाला असाल आणि कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला चांगले क्रेडिट रेटिंग असलेल्या कंपन्यांच्या शॉर्ट-टर्म बाँडमध्ये गुंतवणूक करता येईल. हे डेट फंडस् बँकांच्या एफडीच्या तुलनेत चांगले रिटर्न देऊ शकतात.

टॅक्सच्या नियमांनुसार, म्युच्युअल फंडस्वर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. डेट फंड आणि डेट-ओरिएंटेड हायब्रीड फंडांसाठी 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी केलेली गुंतवणूक शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (STCG) च्या अधीन आहे. ज्यासाठी आपल्याला पैसे भरावे लागतील. Mutual Fund for Senior Citizens

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://groww.in/blog/best-mutual-fund-for-senior-citizens

हे पण वाचा :
SBI कडून ग्राहकांना भेट, बँकेने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ
LPG सिलेंडरच्या बुकिंगवर 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का, होमलोनवरील EMI वाढणार
Stock Tips : आगामी काळात ‘हे’ 5 स्टॉक देऊ शकतील मोठा रिटर्न, आपल्या प्रोफोलिओमध्ये आजच करा समावेश
Train Cancelled : रेल्वेकडून आज 271 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट