Mutual Fund SIP | आजकाल अनेकजण भविष्याचा विचार करून म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करत असतात. अशातच एसआयपीमधील गुंतवणूक आता झपाट्याने वाढलेली दिसत आहे. कारण जर जास्त वेळ एसआयपी केली तर ती अतिशय वेगाने संपत्ती निर्मितीसाठी उपयुक्त आहे. तुम्ही जर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि दीर्घ मुदतीसाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही काही वर्षातच करोडपती होऊ शकता. आता या एसआयपीमध्ये (Mutual Fund SIP)तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल? त्यात किती व्याज मिळेल आणि तुम्ही कशाप्रकारे करोडपती होऊ शकता याची माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
500 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करा
एसआयपी ही अत्यंत लवचिक आहे. म्हणजे यात तुम्ही कधीही तुमची गुंतवणुकीची रक्कम वाढवू शकता. किंवा कमी देखील करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला कुठलीही अडचण आली तर ही एसआरपी तुम्ही मध्येच थांबवून. पुन्हा एकदा सुरू करू शकता. त्याचप्रमाणे कधीही बंद करून तुम्ही पैसे काढू शकता. परंतु तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून लवकरात लवकर कोट्यधीश व्हायचे असेल तर तुम्हाला काही खास स्ट्रॅटेजी वापरणे खूप गरजेचे आहे. आणि आता त्यासाठी आपण जाणून घेणार आहोत.
हा फॉर्मुला फॉलो करा | Mutual Fund SIP
जर तुम्हाला एसआयपीमध्ये ( Mutual Fund SIP) गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पोर्टफोलिओमध्ये किमान 20 ते 25 वर्षासाठी एसआयपी सुरू करा. त्याचप्रमाणे या गुंतवणुकीत तुम्ही दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढ करा. जर तुम्ही 5 हजार रुपये मासिक एसआयपी सुरू केली. तर पुढच्या वर्षी गुंतवणुकीची रक्कम ही 500 रुपयांनी वाढवा. म्हणजेच तुमची पुढच्या वर्षीची गुंतवणुकीची रक्कम 5500 एवढी होईल. त्यानंतर पुढच्या वर्षी त्यात 10 टक्के वाढ करा. अशा प्रकारे एसआयपीमध्ये गुंतवणूक दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढ करत असते करा. ते सलग २० ते २५ वर्षे चालू ठेवा.
अशाप्रकारे करा गुंतवणूक
यामध्ये तुम्हाला जवळपास 12% पर्यंत परतावा मिळतो. कधी कधी यापेक्षाही जास्त मिळतो. जर तुम्ही 5 हजार रुपये पासून करायला सुरुवात केली तर अशा प्रकारे 21 वर्षात तुम्ही करोडपती बनू शकता. 21 वर्षात तुमची गुंतवणुकीची रक्कम ही 38 लाख 40 हजार 150 रुपये एवढी असेल. यावर तुम्हाला फक्त 12% दराने 69 लाख 96 हजार 275 रुपये व्याज म्हणून मिळेल. म्हणजेच 21 वर्षानंतर तुम्ही 1 कोटी 16 लाख 36 हजार 425 रुपयांचे मालक हाल.
तुम्ही तर सलग २५ वर्षे ही गुंतवणूक सुरू ठेवली, तर ही तुमची एकूण गुंतवणूक 59 लाख पेक्षाही जास्त होईल आणि 25 वर्षांपूर्वी 1कोटी 54 लाख 76907 रुपयांचे व्याज मिळेल. अशांमध्ये तुम्ही 25 वर्षानंतर 2 लाख कोटी 1लाख 77 हजार 731 रुपयांचे मालक व्हाल. त्यामुळे तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो करून असावी मध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला खूप चांगला लाभ होईल.