Mutual Funds : ‘या’ तीन फंडांनी 7 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये !!!

Mutual Funds
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Funds :  दीर्घकालावधीमध्ये मोठा फंड तयार करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा एक गुंतवणूकीचा चांगला पर्याय आहे. ज्या लोकांना एकरकमी पैसे गुंतवता येत नाहीत अशा लोकांसाठी SIP हे गुंतवणुकीचे एक उत्तम साधन आहे. यामध्ये दर महिन्याला थोडे थोडे पैसे जमा करून भविष्यासाठी मोठा फंड तयार करता येतो. ब्लूचिप म्युच्युअल फंडस् देखील इक्विटी फंडस् आहेत, जे स्टॉक मार्केटमधील लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.

7 Things about Mutual Fund which every Indian should Know - CRED

ब्लूचिप फंड हे ओपन एंडेड असतात आणि त्यामुळे ते बाजारातील सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये पुरेशी लिक्विडीटी देतात कारण त्याची खरेदी-विक्री कधीही करता येते. आज आपण अशा तीन ब्लूचिप फंडांबाबतची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे. तसेच व्हॅल्यू रिसर्चकडून या तिन्ही फंडस्ना 5 स्टार रेटिंग देखील दिले गेले आहे. या फंडांमध्ये, ज्या गुंतवणूकदारांनी सात वर्षांसाठी 10 हजार रुपयांची मंथली एसआयपी केली असेल त्यांच्याकडे आज 16 लाख रुपयांपर्यंतचा फंड जमा झाला असेल. Mutual Funds

Learn more about the Axis Bluechip Fund and to invest in it - Sentinelassam

Axis Bluechip Fund – Direct Plan

1 जानेवारी 2013 रोजी सुरू झालेल्या या फंड्सला व्हॅल्यू रिसर्चकडून 5 स्टार रेटिंग देखील मिळाले आहे. 30 जून 2022 रोजी या फंडाची AUM 32,322 कोटी रुपये होती तर 22 जुलै रोजी त्याची NAV 46.62 रुपये होती. गेल्या सात वर्षांत फंडाने जवळपास 12.35 टक्के रिटर्न दिला आहे. या कालावधीत, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या फंडामध्ये 10,000 रुपयांची मंथली एसआयपी केली असेल तर आता त्याच्याकडे 13.80 लाख रुपये जमा झाले असतील. त्याचप्रमाणे जर कोण पाच वर्षांसाठी 10 हजार रुपयांची मंथली SIP केली असेल तर आता त्याच्याकडे 8.29 लाख रुपयांचा फंड तयार झाला असेल. Mutual Funds

Mirae Asset launches India's First ETF Tracking Nifty Financial Services  Index Mirae Asset Nifty Financial Services ETF – ThePrint –

Mirae Asset Emerging Bluechip Fund – Direct Plan

एका मीडिया रिपोर्ट्स नुसार 1 जानेवारी 2013 रोजी हा फंड लाँच करण्यात आला होता. व्हॅल्यू रिसर्चने याला 5 स्टार रेटिंग देखील दिले आहे. 30 जून 2022 रोजी या फंडाची AUM 20,664 कोटी रुपये होती. तर त्याची सध्याची NAV 101.15 रुपये आहे. गेल्या वर्षभरात या फंडाने 17.76 टक्के रिटर्न दिला आहे. ज्या गुंतवणूकदाराने या फंडात सात वर्षांसाठी 10,000 रुपयांची मंथली एसआयपी केली असेल त्याला आता 16.36 लाख रुपये मिळाले असतील. त्याचप्रमाणे, पाच वर्षांत, 10,000 रुपयांच्या मंथली एसआयपीद्वारे 9.61 लाख रुपयांचा फंड तयार झाला असेल. Mutual Funds

Canara Robeco Bluechip Equity Fund Direct-Growth - Latest NAV, Returns,  Performance 2022

Canara Robeco Bluechip Equity Fund – Direct Plan

2 जानेवारी 2013 रोजी सुरू झालेल्या या फंड्सला व्हॅल्यू रिसर्चकडून 5 स्टार रेटिंग देखील मिळाले आहे. 30 जून 2022 रोजी फंडाची AUM 6,824 कोटी रुपये होती आणि 22 जुलै रोजी त्याची NAV 43.74 रुपये होती. फंडाने सात वर्षांत 12.92 टक्के रिटर्न दिला आहे. ज्या गुंतवणूकदाराने या फंडात सात वर्षांसाठी 10,000 रुपयांची मंथली एसआयपी केली आहे, त्यांच्याकडे 14.62 लाख रुपयांचा फंड आहे. त्याचप्रमाणे या फंडाने पाच वर्षांत 14.41 टक्के रिटर्न दिला आहे. या कालावधीत या फंडात केलेल्या 10 हजार रुपयांच्या मंथली एसआयपीने 8.94 लाख रुपयांचा फंड तयार केला आहे. Mutual Funds

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.investor.gov/introduction-investing/investing-basics

हे पण वाचा :

FD Rates : SBI की पोस्ट ऑफिस यापैकी कोणत्या FD वर चांगला रिटर्न मिळेल ते पहा !!!

Multibagger Stocks : घसरत्या बाजारातही ‘या’ 5 स्मॉलकॅप शेअर्सनी दिला 500 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

Silver Price : चांदीमध्ये खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का ???

Bank FD : ‘या’ तीन बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळत आहे जास्त व्याज !!!

FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकांनी देखील FD वरील व्याजदर वाढवले !!!