हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभर वाळू माफियांचा सध्या मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे.या माफियांनी अनेक ठिकाणी धुडगूस घालायला सुरुवात केली आहे.याचं ताजं उदाहरण सांगलीतल्या आटपाडी तालुक्यातील निंबवडे गावात घडलंय.
निंबवडे गावातील एक सर्वसामान्य शेतकरी विजय पिंजारी हे सोमवारी (ता.०१) रोजी आपल्या शेतात काम करत होते.शेताला लागूनच असलेल्या ओढ्यात प्रदीप बुधावले आणि लक्ष्मण बुधावले हे दोन वाळू माफिया वाळू भरत असल्याचे पिंजारी यांच्या लक्षात आले.विजय पिंजारींनी प्रदीप बुधावले आणि लक्ष्मण बुधावले यांना इथून वाळू भरू नका असे सांगितले.
पण त्या दोन्ही जणांनी पिंजारी यांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करत त्यांना मारहाण केली.तसेच जास्त आगाऊपणा केला तर जिवानिशी जाशील अशी धमकी देखील दिली.या प्रकरणावरून पिंजारी यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवली आहे.या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करीत आहेत.पण अशा प्रकारामुळे विजय पिंजारी हे प्रचंड धास्तावलेले आहेत.आणि परिसरात देखील या माफियांच्या कृत्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.