Saturday, March 25, 2023

महाराष्ट्र झोपेत असताना हे सरकार जाईल ; चंद्रकांत पाटलांचं भाकीत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे महाविकास आघाडी मध्ये नक्कीच आलबेल आहे की नाही अशी शंका उपस्थित होत आहे. त्यातच आता महाराष्ट्र झोपेत असताना हे सरकार जाईल अस भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

अठरा महिन्यांपूर्वी सरकार आलं तेव्हाच महाविकास आघाडीतील नेत्यांनी घरी जाण्याची मानसिकता बनवली आहे. आपण फार काळ सत्तेत राहणार नाही याची जाणीव त्यांना झाली आहे. तरीही अठरा महिने हे सरकार टिकले आहे. सध्या त्यांचा बोनस काळ सुरू आहे. त्यामुळे जसे झोपेत असताना सरकार आले, तसे महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडेल.’

- Advertisement -

सरकार 5 वर्ष टिकणार – संजय राऊत

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र हे सरकार 5 वर्ष टिकणार अशा शब्दांत विरोधकांना सुनावलं आहे. शरद पवार यांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद आहे त्यामुळे अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका? असेही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.