माझं घर आणि शाळेची रेकी सुरु; दोन व्यक्तींचे फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणापासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने एकामागून एक आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक खळबळजनक ट्विट करत गंभीर आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून काही लोक माझ्या घराची आणि शाळेची रेकी करत असल्याचा आरोप मलिकांनी केलाय. इतकंच नाही तर दोन व्यक्तींचे फोटोही मलिक यांनी ट्विट केले आहेत.

मलिकांनी ट्विट करत काहीजण या गाडीत बसून मागील काही दिवसांपासून माझ्या घराची आणि शाळेची रेकी करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्यावी. जे लोक या फोटोत आहेत त्यांना माझं म्हणणं आहे. जर माझ्याविषयी माहिती हवी तर मला येऊन भेटावं. मी सगळी माहिती देईन असं त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, नवाब मलिकांनी दोन व्यक्तींचे फोटो पोस्ट करत हा दावा केलाय. दोन लोक रेकी करत असलेल्या गाडीचा क्रमांक MH 47 AG 2466 असा आहे. यामध्ये एका व्यक्तीच्या हातात कॅमेराही दिसतोय. त्यामुळे नवाब मलिकांच्या दाव्यानं चांगलीच खळबळ माजली आहे. मलिकांची रेकी करण्यास कुणी सांगितलं? याबाबतच्या उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.