माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला : राजेश टोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईतील विरार येथील घटनेबाबत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे. विरारच्या घटना हि अत्यंत वाईट आहे. या घटनेतील मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईतील विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही दुर्घटना राज्य सरकारच्या अंतर्गत बाब असून राष्ट्रीय स्तरावरील बातमी नसल्याचं म्हटलं. त्यानंतर टोपे यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला आहे, असं स्पष्टीकरण दिला.

डॉ. टोपे म्हणाले, “माझ्यावर आलेल्या अतिदुःखाच्या प्रसंगात देखील मी माझं कर्तव्य व जबाबदारीला नेहमीच महत्व दिलेलं आहे. मी अत्यंत संवेदनशीलतेने काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या मनात जे विचार असतात, ते नेहमी सामान्य माणसाला त्रास होऊ नये यासाठी मी संपूर्ण संवेदनशीलतेने काम करत आलेलो आहे. त्यामुळे मला वाटतं माध्यमांना या सगळ्या गोष्टींची माहिती आहे.

डॉ. टोपे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात आता ऑक्सिजन वाहतूक करण्यासाठी व त्यात गती वाढविण्यासाठी आता एअरफोर्सचेही सहकार्य घेतले जाणार आहे. वास्तविक पाहता ऑक्सिजन इतर राज्यातून आपल्या राज्यात येण्यासाठी उशीर होत आहे. सध्या विशाखा पट्टणम येथून रेल्वे येत आहे. परंतु त्यास उशीर झाला आहे. ज्या राज्यातून ऑक्सिजन मिळेल तिथे रिकामे टँकर्स एअरलिफ्ट केले जातील. एअरफोर्सच्या माध्यमातून रिकामे टँकर्स पाठवले जातील.

राज्यातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत व कोरोना परिस्थितीबाबत आज पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. सकाळी नऊ ते दहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हि या व्हिडीओ कॉन्फरन्सला उपस्थित होते. यावेळी अनेक विषयांवर पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. यावेळी राज्यातील साखर कारखान्याबाबात शरद पवार साहेबांनी सूचना दिल्या आहेत. सिलेंडर मागवले आहेत. जमेल त्या मार्गाने कशी उपलब्धता वाढवता येईल करत आहोत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या चर्चेवेळी पंतप्रधानमंत्री मोदी यांनी ऑक्सिजन संदर्भात ऑक्सिजन ऑडिट करावेत, ऑक्सिजन वाया जात असेल तर ते वाचवावेत, एक राज्यातून दुसऱ्या राज्यात ऑक्सिजन जात असताना अडवू नये, अशा सूचना मोदी यांनी दिल्या आहेत,  असे डॉ. टोपे यांनी सांगितलं.

Leave a Comment