‘MYLON’ फार्मा कंपनीने लाँन्च केले COVID-19 वरील औषध; जाणुन घ्या काय आहे किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । करोनाचा प्रभाव हा वाढतच आहे . अश्यातच आनंदाची बातमी म्हणजे मायलन (Mylan) या फार्मा कंपनीने कोरोना आजारावरती ‘डेसरेम’ नावाची रेमडेसिविर (Remdesivir) हे जेनरिक मेडिकल औषध लॉन्च केले आहे. या औषधाच्या ‘रुग्णांवर आणि लॅब मध्ये झालेल्या चाचण्यांमधून हे औषध कोविड १९ रुग्णाच्या उपचारासाठी हे औषध वापरले जाऊ शकते असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

‘ रेमडेसिविर’ हे औषध भारतीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाले आहे. त्याची किंमत ४८०० रुपये आहे. त्याबरोबरच कंपनीने एक हेल्प लाइन नंबर उपलब्ध केला आहे. त्यानुसार रुग्ण आणि डॉक्टर या नंबरवरून अधिक माहिती विचारू शकतात.यापूर्वी ‘हेटेरो ची रेमडेसिवि’र आणि ‘सिप्ला ची रेमडेसिविर’ हे औषध बाजारामध्ये उपलब्ध झाले होते. त्याची प्रामुख्याने किंमत ५४०० और रुपये ४००० रुपये होती.

कंपनीने सर्वांसाठी हेल्प लाइन नंबर दिला आहे. ७८२९९८००६६ या नंबर वर कॉल करून या औषधाविषयी अधिक माहिती मिळवू शकता. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करत हे औषध उपलब्ध केले आहे. त्यानुसार किती प्रमाणात औषध तयार आहे आणि गरजूना हे औषध मिळण्याविषयी सर्व माहिती मिळाली जाईल. काही प्रमाणात या औषधाचा असर कोरोना रोगावरती होत आहे.

भारतामध्ये असलेल्या मायलन फार्मा या कंपनीचे अध्यक्ष राकेश बजमई यांनी सांगितले कि, ‘रेमडेसिविर’ हे औषध भारतीय वाणिज्यिक उत्पादन विभागाने संमती दिल्यानंतर आमच्या कंपनीने कोविड १९ साठी जेनिरिक वर्जन तयार केले आहे. हे औषध बंगळुरू मध्ये बनविले आहे. देशातील लोकांची वाढती मागणी पाहता हे औषध सर्वांना उपलंब्ध करून देणार आहोत. औषधाचा पहिला स्लॉट आज रिलीज झाला आहे.