मुंबई प्रतिनिधी | सचिन अहिर यांनी शिवसेना प्रवेश केल्याने वरळीचे शिवसेना आमदार सुनील शिंदे गॅसवर गेल्याचे सध्या चित्र आहे. आज सचिन अहिर यांच्या प्रवेशावेळी सचिन अहिर यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर मातोश्री बाहेर जमले होते. तेव्हा यांच्या समक्ष सुनील शिंदे यांचे कार्यकर्ते देखील मातोश्री बाहेर येऊन जामा झाले. तेव्हा सुनील शिंदे या याठिकाणी दाखल झाले.
मातोश्री बाहेर दाखल झालेल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी आलेल्या सुनील शिंदे यांना पत्रकारांनी ऐनवेळी गाठले आणि त्यांना सचिन अहिर यांच्या प्रवेशाबद्दल विचारांना केली त्यावर सुनील शिंदे यांनी फारच खोचक प्रतिक्रिया दिली.
कोणी शिवसेनेत प्रवेश केला हे मला माहित नाही. मात्र इथून पुःडे देखील वरळीच्या आमदार मीच असणार आहे असे सुनील शिंदे म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर आपला विश्वास असणार आहे असे म्हणले आहे. त्याच प्रमाणे उद्धव ठाकरे जो निर्णय घेतिलतो पक्ष हिताचा असेल असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.