मुंबई प्रतिनिधी | राजकारणात विचारधारा रसातळाला गेल्याचा प्रत्येय २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आला आहे. याचाच एक नव्याने दाखला देण्याचा प्रयत्न गौरव नायकवडी यांनी केला आहे. त्यांनी उमेदवारीसाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची घटना आज मुंबईमध्ये घडली आहे. भाजपकडून तिकिटासाठी आग्रही असणारे गौरव नायकवडी इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने शिवसेनेत गेले आहेत.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या इंग्रज विरोधी सशस्त्र क्रांती लढ्यात बिनीचे शिलेदार म्हणून भूमिका बजावलेल्या स्वातंत्र्यसैनिक नागनाथअण्णा नायकवडी यांचे गौरव नायकवडी सख्खे नातू. जातीवादी आणि धर्मवादी विचारधारेला माजी एकी काहीच थारा नाही असे म्हणणाऱ्या नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नातूने मात्र हिंदुत्ववादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना इस्लामपूर विधानसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी दिली जाणार आहे.
गौरव नायकवडी यांना वाळव्याचे सरपंच म्हणून काम करण्याचा अनुभव असला तरी त्यांचा संपूर्ण मतदारसंघात संपर्क नाही. गौरव नायकवडी हे निवडणुकीच्या ऐनवेळी विधानसभेसाठी इच्छुक असल्याच्या बातम्या आधी स्थानिक वृत्तपत्रातून आणि नंतर इलेट्रॉनिक माध्यमातून झळकू लागल्या. इस्लामपूर मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे त्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि सध्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांना नवखे गौरव नायकवडी कशी टक्कर देणार हे राजकीय विश्लेषणाकच्या समोर देखील प्रश्नवाचक चिन्हच आहे. आयुष्यभर जातीवादी पक्षाला विरोध करणाऱ्या नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नावावर त्यांचे नातू हिंदुत्ववादी पक्षाकडून मते मागणार हे मात्र निश्चित.