हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातील दिग्गज नेतेमंडळी आणि अनेक बॉलीवूड कलाकार उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उपस्थिती लावली होती. मात्र लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी काँग्रेसचे मोठे नेतेमंडळी उपस्थित नव्हती. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याना विचारलं असता त्यांनी यामागचे कारण सांगितले.
नाना पटोले म्हणाले, आमचे बरेच नेते कोरोनाबाधित होते. त्यामुळे ते काल लता दिदींच्या अंत्यदर्शनाला हजर राहू शकले नाहीत. माझ्या बहिणीच्या सासूसुद्धा वारल्यामुळे मी तिकडे होतो. पण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि आमची टीम लतादीदींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होती, असं पटोले म्हणाले.
दरम्यान, लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळी उपस्थित होते. अत्यंत श्रायुनयनांनी लता मंगेशकर याना अखेरचा निरोप देण्यात आला.