हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येऊन थेट काँग्रेस वर हल्लाबोल करत युपीए वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेवर भाष्य करत काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेऊन राजकारण करणे म्हणज फॅसिस्ट राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखे आहे असं म्हंटल आहे. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नांना पटोले यांनी शिवसेनेच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे. सामनातील भूमिका देशहितासाठीच आहे असं नाना पटोले यांनी म्हंटल.
नाना पटोले म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी मुंबईला येऊन जे वक्तव्य केलं ते एक प्रकारे देश विकणार्यांची साथ देण्याचा प्रकार होता. आज देशात जी काही परिस्थिती आहे ती जे लोक समजतात ते चांगली च भूमिका मांडणार आहेत. देश विकणाऱ्या सोबत रहायचं की देश वाचवणार्या सोबत रहायचं हे देशातील प्रत्येक राजकीय दलाने ठरवायचे आहे. सामना ने आज जी भूमिका मांडली ते देश हितासाठी मांडलेली आहे ते कोणते सरकार वाचवण्यासाठी मांडलेली भूमिका नाही असे नाना पटोले यांनी म्हंटल.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल-
विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भापापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढय़ा सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न आहे. काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या ‘फॅसिस्ट’ राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखेच आहे. काँग्रेसचा सुपडा साफ व्हावा असे मोदी व त्यांच्या भाजपास वाटणे एकवेळ समजू शकतो. तो त्यांच्या कार्यक्रमाचाच भाग आहे, पण मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱयांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका आहे. असे शिवसेनेनं म्हंटल.