काँग्रेसशिवाय देशातील विरोधकांची मोट बांधणं अशक्य; नवाब मलिक यांचे महत्वाचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांच्या दौर्‍यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पवारांशी चर्चा केली. त्यांनी देशात मोदी सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पर्याय देण्याची गरज असल्याचे मत मांडले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी काँग्रेसबाबत महत्वाचे विधान केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीपासून स्पष्ट भूमिका घेतली आहे. काँग्रेस शिवाय देशातील विरोधी पक्षांची मोट बांधण अशक्य आहे, असे मत शरद पवारांचेआहे. काँग्रेससह नॉन युपीएच्या खासदारांची संख्या 150 आहे, यांना पण सोबत आणणे गरजेचे आहे

काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची मोठी आघाडी निर्माण करण्याचे काम देशात होईल, त्याचे नेतृत्व कोण करेल आता तो विषय नाही. मात्र, सामुहिक नेतृत्व असेल काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजुट शक्य नाही. ममता दिदींचेही तेच म्हणने असल्याचे मलिक यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment