निवडणुका संपताच मोदी सरकारचे जनतेवर अत्याचार सुरू; महागाई वरून नाना पटोलेंचा निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईचा भडका उडालेला आहे. पेट्रोल डीझेल आणि गॅस सिलेंडर च्या किंमती मध्ये मोठी दरवाढ झाली असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चाप बसला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे.
निवडणुका संपताच मोदी सरकारचे जनतेवर अत्याचार सुरू झाले अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

याबाबत नाना पटोले यांनी ट्विट करत म्हंटल की, निवडणुका संपताच मोदी सरकारचे जनतेवर अत्याचार सुरू झाले. आधी घाऊक डिझेलची दरवाढ करुन महागाई वाढवली, आता एका दिवसातच पेट्रोल-डिझेलचे भाव ८० पैशांनी वाढवले, तर घरगुती गॅसचा ५० रुपयांनी भडका उडाला आहे. याचबरोबर त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात आल्यापासून सातत्याने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलाचे दर वाढत आहेत. एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये ५० रुपये तर पेट्रोल व डिझेलमध्ये ८० पैशांची वाढ केली. आधीच पेट्रोल, डिझेल प्रति लिटरचा दर शंभर रुपयांपेक्षा जास्त आहे. तर गॅस सिलिंडर एक हजाराच्या जवळ पोहचला आहे. रशियाकडून कच्चे तेल सवलतीच्या किमतीत घेऊनही इंधन दरवाढ केली आहे.

डिझेलची ठोक खरेदी करणारे रेल्वे, एसटी महामंडळ, उर्जा प्रकल्प, सिमेंट उत्पादन, मॉल्स यांच्यासाठीचे डिझेल २५ रुपये प्रती लिटरने महाग केले आहे. यामुळे महागाई वाढून त्याचा फटकाही शेवटी सामान्य माणसांनाच बसणार आहे. महागाईने मागील सात महिन्यातील उच्चांक गाठला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

Leave a Comment