Wednesday, October 5, 2022

Buy now

“एसटी कर्मचाऱ्यांबाबतीत सरकारच्या संवेदना गोठल्यात का?”; प्रवीण दरेकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आहे. या विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी विलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी आणखीन 15 दिवसांची मुदतवाढ हवी असल्याचे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दररोज एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा कुणीही फायदा घेऊ नये. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारची संवेदनशीतला गोठली आहे का?” असा संतप्त सवाल दरेकर यांनी केला.

प्रवीण दरेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “एसटी कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा कुणीही फायदा घेऊ नये. रोज एसटी कर्मचारी आत्महत्ता करत आहेत. मग सरकारची संवेदनशीतला गोठली आहे का? या संदर्भात लवकरच कॅबिनेटची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आम्ही घेऊ. त्यांच्याशी चर्चा करू त्यानंतर निर्णय जाहीर केला जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीवरून गुणरत्न सदावर्ते यांनीही परिवहन मंत्री अनिल परब आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी सदावर्ते म्हणाले की, परिवहनमंत्री धाडी पडल्यामुळे बीझी असल्यामुळेच न्यायालयाने कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने कारवाई न करण्यास सांगितले. आज सुनावणीवेळी राज्य सरकार न्यायालयात खोट बोलले, असे सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.