हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारच्यावतीने माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आज पुन्हा पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला असून “कोरोना, महापुराच्या काळात मोदींनी महाराष्ट्राशी दुजाभाव केल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.
महाराष्ट्रास इतर राज्यात अतिवृष्टीमुळे महापुराचे संकट आले होते. त्यानंतर महाराष्ट्र वगळता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देत तेथील नुकसानीची पाहणी केली होती. यावरून आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राज्यात एकाच वर्षी कोकणात वादळ, महापूर आला आणि कोरोनाचे संकट आले. या काळात देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांनी या ठिकाणी येऊन पाहणी करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी इतर राज्यांना भेटी दिल्या.
एवढेच नाही तर केंद्रातील एनडीआरएफच्या माध्यमातून राज्याला मदत देण्यात येईल मोदी सरकारने सांगितले होते. मात्र, ती मदत अद्यापही मिळाली नाही. कोरोना काळातही केंद्राने महाराष्ट्राशी दुजाभाव केला. रेमडेसिव्हर असेल किंवा लसी असतील, केंद्राने नेहमीच हात आखडता घेतला, असल्याची टीका यावेळी पटोले यांनी केली.