मुंबई महापालिकेसह स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस लढणार स्वबळावर : नाना पटोलेंची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याचे यापूर्वीही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील नेत्यांनीही आपापली मते व्यक्त केली. दरम्यान, आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर पटोले यांनी महाराष्ट्रात मुंबई महापालिकेसह स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली.

महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एचके पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील भविष्यकाळातील प्रदेश संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला. पाटील यांनी मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आणि मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांची बैठक घेत काँग्रेस आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक चर्चा केली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्ली येथे आज जाऊन महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील व काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीवेळी अनेक विषयांवर चर्चा झाली.

दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले कि, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांचे म्हणणे आहे की, लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र लढवल्या जातील. स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई महापालिकेसह कशा लढवायच्या यांचे अधिकार प्रदेशातील नेते मिळून निर्णय घेतील, अशी माहिती पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.