नाणारला रिफायनरी प्रकल्प होणार नाही, बारसूच्या जागेचे केंद्राला पत्र : उदय सामंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

नाणार रिफायनरी प्रकल्पा संदर्भात शिवसेनेची भूमिका बदलत आहे, हा फार मोठा अपप्रचार आहे. नाणारला रिफायनरी होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कोणत्याही परिस्थिती नाणारला आम्ही रिफायनरी होवू देणार नाही. सध्या बारसू रिफायनरीचा विषय चालू असल्याचे माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

कराड येथे शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोकणातल्या नाणारमधील गुंडाळण्यात आलेला रिफायनरी प्रकल्प आता राजापूर तालुक्यातील बारसू इथ होणार असल्याबाबत कागदोपत्री सुरू आहे. काही दिवसापासून शिवसेना पक्ष नाणारलाही रिफायनरी प्रकल्प पुन्हा सुरू करत असल्याच्या प्रश्नावर उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नाणार नंतर बारसू येथील लोकही ठाकरे सरकार विरोधात अनेकदा आंदोलन करत रस्त्यावर उतरले होते.

यावेळी ते पुढे म्हणाले, बारसू रिफायनरीला महाराष्ट्र सरकारने जागा दिली, रिफायनरी सुरू केली अशा पध्दतीने मागणी केली. बारसू रिफायनरी बाबत या गोष्टी जे लोक सांगत आहे, अशांना सांगू इच्छितो की, रिफायनरी ही महाराष्ट्रातच रहावी. यासाठी ज्या काही जागा आहेत, त्यामध्ये बारसूची जागा आहे. ती जागा चालेल का अशा पध्दतीचे पत्र मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला दिलेल आहे. केंद्र सरकारने ती जागा मान्य केली तर ते जागेचा सर्व्हे करतील. त्यानंतरची पुढची ही स्टेप आहे. परंतु नाणार बाबत ती लोक बोंबाबोंब करतात. नाणारमध्ये 100 टक्के रिफायनरी होणार नाही.

Leave a Comment