किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये किरकोळ कारणावरून आरोपी तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपीने हि हत्या केली आहे. एका नातेवाईकाच्या लग्नात आरोपी तरुण व मृत तरुण यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरामध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. गोविंद शेळके असे या मृत तरुणाचे नाव आहे. प्रेम घोटकर उर्फ टिल्या घोटकर असे खून केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
दहा दिवसांपूर्वी एका नातेवाईकाच्या लग्नात गोविंद शेळके आणि प्रेम उर्फ टिल्या घोटकर या दोन मित्रांमध्ये एका किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपी प्रेमने घटनेच्या दिवशी गोविंदाला रात्री दहा वाजता वाघोबा गल्लीत एकांतात गाठले आणि त्याच्यावर चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली.

या हल्ल्यात गोविंद गंभीर जखमी झाला होता. स्थानिकांनी गोविंदला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारा दरम्यान गोविंदचा मृत्यू झाला. हि हत्या केल्यानंतर आरोपी प्रेम घोटकर हा फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला रात्री अटक केली. या हत्येप्रकरणी मृत गोविंद शेळकेची आई महादाबाई शेळके यांच्या तक्रारीवरून मुखेड पोलिसात प्रेम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुखेड पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment