‘या’ क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून बाप-लेकाची तरुणाला बेदम मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नांदेड शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील विणकर कॉलनीमध्ये एका तरुणाची लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. खिचडी खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादानंतर आरोपी पिता-पुत्राने त्याचा खून केला आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी आरोपी बाप लेकाला अटक केली आहे. यानंतर या बाप लेकाला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून 30 मार्च रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवलिंग गायंकी आणि प्रियदर्शन गायंकी या दोघां बापलेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमके काय घडले ?
नांदेड तालुक्यातील धनेगावजवळ असलेल्या शासकीय दूध डेअरी चौकातील विणकर कॉलनी भागात राहणारे योगेश विलास गिरी आणि शिवलिंग व्यंकटराव गायंकी हे दोघेजण देगाव, येळेगाव कारखाना या ठिकाणी कामासाठी गेले होते. यानंतर हे दोघेजण भोकरफाटा मार्गे घरी परतले. यावेळी परतताना योगेश गिरी याने भोकरफाटा येथून खिचडी पार्सल घेतली मात्र ते खिचडीचे हे पार्सल शिवलिंग गायकी याच्या घरी विसरले.

खिचडी खाल्ल्यावरुन वादावादी
यादरम्यान शिवलिंगच्या घरच्याने ही खिचडी खाल्ली. थोड्या वेळाने खिचडीचे पार्सल घेण्यासाठी योगेश गिरी हा शिवलिंगच्या घरी आला . पण ही खिचडी खाल्ल्याच्या कारणावरून त्यांच्यात मोठा वाद झाला. यावेळी शिवलिंग गायंकी आणि त्याचा मुलगा प्रियदर्शन गायंकी या दोघांनी योगेश गिरी यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत योगेशचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापलेकांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक माणिक हंबर्डे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment