Nanded Mumbai Vande Bharat Express : अखेर नांदेडकरांचे स्वप्न पूर्ण झालं!! वंदे भारतला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

Nanded Mumbai Vande Bharat Express
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nanded Mumbai Vande Bharat Express। नांदेडच्या जनतेसाठी आजचा दिवस खूपच सुखावणारा ठरला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करण्याचे नांदेडकरांचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. खरं तर हीच ट्रेन सुरुवातीला मुंबईपासून जालनापर्यंत धावत होती, मात्र आता तिचा विस्तार थेट नांदेड पर्यंत कऱण्यात आला आहे. या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे मराठवाड्याला मोठा फायदा होणार आहे.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबे ? Nanded Mumbai Vande Bharat Express

मुंबईहून मराठवाड्यात धावणारी ही सर्वात वेगवान गाडी (Nanded Mumbai Vande Bharat Express) असून इतर गाड्यांच्या तुलनेत कमी वेळेत प्रवास पूर्ण करते. गुरुवारी 28 ऑगस्टपासून ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातील सहा दिवस नियमितपणे धावेल. ही गाडी नांदेडहून 5 वाजता निघेल, 5:40 वाजता परभणी, 7:20 वाजता जालना, 8:13 वाजता छत्रपती संभाजीनगर, 9.58 वाजता मनमाड जंक्शन, 11 वाजता नाशिक रोड, दुपारी 1.20 वाजता कल्याण, 1:40 ठाणे आणि 2.08 वाजता दादरला पोहोचेल. यानंतर 2.25 वाजता ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल. या नव्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे नांदेड आणि मुंबईमधील 610 किलोमीटरचे अंतर केवळ 9 तास 25 मिनिटांत पूर्ण होईल. यादरम्यान ती दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड या स्थानकांवर थांबेल.

काय काय सुविधा ?

मुंबई नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Nanded Mumbai Vande Bharat Express) मध्ये एकूण 20 डबे (2 एक्झिक्युटिव्ह आणि 18 चेअर कार) आहेत. जवळपास १५०० प्रवासी या ट्रेनमधून आरामात प्रवास करू शकतील. नव्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, आलिशान इंटीरियर, बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स, प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉइंट्स, अत्याधुनिक एअर कंडिशनिंग सिस्टिम यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

मराठवाड्याला काय फायदा –

मराठवाड्यातील जनता थेट मुंबईशी जोडले जाईल.
अतिशय कमी वेळेत आणि आरामात मुंबई गाठता येईल.
मुंबईत नोकरीला असलेला आणि मूळचा नांदेडचा रहिवासी असणाऱ्यांना सर्वात जास्त फायदा
पर्यटनस्थळे आणि तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी फायदेशीर
नांदेड येथील प्रसिद्ध सचखंड साहिब गुरुद्वारा, जालन्यातील राजूर गणपती मंदिर, छत्रपती संभाजीनगरजवळील घृणेश्वर ज्योतिर्लिंग, अजिंठा-वेरूळ लेणी या तीर्थक्षेत्रांना जाता येणार