नारायण राणे म्हणतात ‘भाजप प्रवेश निश्चित’! जिल्हाध्यक्ष-‘आम्हाला कोणतेही संकेत नाहीत’

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिंधुदुर्ग प्रतिनिधी। महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या भाजपा प्रवेशाबाबत दावा प्रस्थापित केला आहे. सिंधुदुर्ग येथील झालेल्या महाजनादेश यात्रेच्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान त्यांनी संपूर्ण पक्ष भाजप मध्ये विलीन करणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. तसेच पक्ष प्रवेश हा मुंबई मध्येच होणार असून त्यावेळेस च बाकीचे धोरण सर्वांना समजेल असे हि त्यांनी सांगितले आहे.

मात्र नारायण राणे यांच्या पक्ष प्रवेशावर जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी ‘आम्हाला कोणतेही संकेत नाहीत’ म्हणून हाथ वर केले आहेत. ‘युतीच्या उमेदवाराची  तयारी दोन वर्षांपासून सुरू आहे. तसेच भाजपचा उमेदवार ‘गल्लीत नाही ठरवत तर दिल्लीत ठरवला जातो’ असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान यामुळे पुन्हा एकदा नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.