हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत देशपातळीवरील राजकारणाबाबत चर्चा झाल्याचे दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आले. याच भेटीवरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टिका केली आहे.
नारायण राणे यांनी ट्विट करत म्हंटल की , सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले तर त्याचा समुद्र तयार होत नाही. दाक्षिणात्य लोकांच्या विरोधात शिवसेना पूर्वी एक घोषणा देत होती. हटाव लुंगी बजाव पुंगी! आता आम्ही (शिवसेना) व तेलंगणा भाऊ भाऊ काय.. अजब परिवर्तन!
सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले तर त्याचा समुद्र तयार होत नाही. दाक्षिणात्य लोकांच्या विरोधात शिवसेना पूर्वी एक घोषणा देत होती.
हटाव लुंगी
बजाव पुंगी!
आता आम्ही (शिवसेना) व तेलंगणा भाऊ भाऊ काय.. अजब परिवर्तन!— Narayan Rane (@MeNarayanRane) February 21, 2022
तुम्ही (तेलंगणा) आम्ही (शिवसेना) भाऊ भाऊ मिळेल ते मिळून खाऊ! महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नाही व तेलंगणा म्हणजे भारतही नाही. भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार आहे व भाजपचे ३०१ खासदार आहेत असे नारायण राणे यांनी म्हंटल.
दरम्यान, चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे भेटीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य करत याबाबत जास्त काही फरक पडणार नाही अस म्हंटल आहे. या सगळ्या मंडळींनी मागील लोकसभेतही हातात हात घालून मोठी आघाडी तयार केली. पण त्याचा काही परिणाम झाला नाही फडणवीस यांनी म्हंटल.