कार्यक्रमाला आमच्याकडून कोणतेही गालबोट लागणार नाही- नारायण राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोकणवासीयांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून सिंधुदुर्गातील नव्या ‘चिपी परुळे’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु होत आहे. आज दुपारी 12.30 वाजता या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाला आमच्याकडून कोणतेही गालबोट लागणार नाही अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे

चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी शिवसेनेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची घोषणा कनारायण राणे यांनी केली होती. मात्र, 18 तास होत नाही तोच राणे बॅकफूटवर गेले आहेत. उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही. कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्या आमच्याकडून होणार नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.

तसेच व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खुर्ची माझ्या शेजारी असेल तर चांगली गोष्ट आहे असेही राणे यांनी म्हंटल . बऱ्याच वर्षाने हा योग आला, असं ते म्हणाले. या उद्घाटनाला नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते. या सोहळ्यासाठी ठाकरे आणि शिंदे एकाच विमानातून जाणार असल्याची चर्चाही होती. मात्र, आता ज्योतिरादित्य शिंदे यांनी कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजेरी लावणार नसून ते ऑनलाईन हजेरी लावणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर शिवसेनेचीच छाप पडणार असल्याचंही बोललं जात आहे.

Leave a Comment