हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या सध्याच्या राजकीय स्थितीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. शिवसेनेचे अस्तित्व संपलं आहे, आता शिवसेना पुन्हा उठत नाही अस म्हणत त्यांनी पुन्हा एकदा डिवचले आहे. नारायण राणे यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली.
शिवसेनेवर आलेल्या या परिस्थितीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हेच जबाबदार आहेत अस राणे म्हणाले. उद्धव ठाकरे आपल्याच आमदाराना ८-८ तास भेटत नव्हते. ताटकळत ठेवायचे, त्यांची काम करायची नाहीत. फक्त मातोश्रीच्या जवळच्यांची कामे केली आणि नारायण राणेंच्या घराला नोटीस देण्याचे काम फक्त उद्धव ठाकरेंनी केल असा टोला राणेंनी केला.
शरद पवार यांनी हे सरकार ६ महिन्यात कोसळेल असं भाकीत केलं होत याबाबत राणेंना विचारलं असता त्यांनी पुन्हा एकदा पवारांवर निशाणा साधला. ६ महिने तरी होऊद्या आधी. पवार साहेबानी कधीतरी आयुष्यात चांगलं काहीतरी बोलावं. राज्यातील सरकार सारखं बदलणे हे राज्याच्या विकासासाठी उपयुक्त नाही. त्यामुळे शरद पवारांसारख्या व्यक्तीने सरकार राहावं अशा शुभेच्छा द्यावा, हेच आम्हाला अभिप्रेत आहे असे नारायण राणे म्हणाले.