हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचे भाकीत केले. त्यांच्या या भाकितावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “मध्यावधी निवडणुकीसाठी युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती आलीय का? कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार? उद्धव ठाकरेंनी कारण सांगावं की, या कारणासाठी मध्यावधी निवडणूक होईल. त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात का? असा सवाल राणेंनी ठाकरेंना केला आहे.
नारायण राणेंनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना वाटत असेल कि निवडणुका होतील तर तसं होत नाही. कारण शिवसैनिकाच्या बैठकीत अभ्यासू किंवा वैचारिक पद्धतीने त्यांनी सूचना दिलेली नाही. घरबसल्या बोलायला काय? त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं”, असा इशारा राणेंनी ठाकरेंना दिला.
शिर्डीतील चिंतन शिबिरात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी गैरहजेरी लावली. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावरून राणेंनी टिप्पणी केली. “अजित पवारांची नाराजी त्यांच्या जवळचे आहेत, आमचे देवेंद्र फडणवीस यांना जास्त माहिती आहे. त्यांना विचारुन सांगतो,”असे राणे यांनी म्हंटले.