हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे गुजरात येथे जवळपास 25 आमदारांसोबत असून राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सूचक ट्विट केलं आहे.
शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता. अस ट्विट नारायण राणे यांनी केले आहे. नारायण राणे यांच्या ट्विट ने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. शिंदे भाजपसोबत जाणार का? की नवीन पक्ष काढणार हे पाहावे लागेल.
शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 21, 2022
दरम्यान, एकनाथ शिंदे दुपारी 2 वाजता सुरत येथून पत्रकार परिषद घेतील आणि आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर होणार का? की शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार हे पाहावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काहीच आलबेल नसल्याची चर्चा सुरू होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.