“सुशांतसिंग, दिशा सालियनची आत्महत्या हत्याच”; नारायण राणेंचे ट्वीट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकारण सध्या अनेक मुद्यांनी चांगलेच तापले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीवर आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा आरोप केला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. राणेंनी शिवसेना खासदार विनायक राऊतांना उद्देशून एक ट्वीट केले आहे. “सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली. त्या प्रकरणाची चौकशी परत होईल, असा दावा राणेंनी केला आहे.

नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी, लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार?’, असे ट्वीट राणे यांनी केले आहे.

दरम्यान, राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीचाही उल्लेख केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये राणे म्हणाले की, ‘मातोश्री’ वरील चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले, असे राणे यांनी म्हंटले आहे.