दिल्ली | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यंदा उत्तराखंड येथील हर्षिल सीमारेषेवर भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यावेळी पंतप्रधानांसोबत आर्मी चीफ बिपिन रावत आणि सैन्याचे अन्य अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
यादरम्यान पंतप्रधान मोदी सीमारेषेवरील भारतीय सैन्याची पाहणी करणार आहेत तसेच आवश्यक इन्फ्रास्ट्रक्टरचा आढावा घेणार आहेत. जवानांना शुभेच्छा दिल्यानंतर नरेंन्द्र मोदी दारनाथ मंदिर येथे दर्शन घेणार असल्याचे समजत आहे.