मोदींना तर अर्थव्यवस्थाच समजत नाही ; भाजप खासदारांचा घरचा आहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताच्या अर्थमंत्रालयामध्ये कमी बुद्धी, कमी IQ वाले लोक आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना तर अर्थव्य़वस्थेबाबत काही कळत नाही, अशी खरमरीत टीका भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

देशाच्या अर्थमंत्रालयात कमी आयक्यू असलेले लोक आहेत. मी पंतप्रधानांचा जुना मित्र असल्याने मोदींना ओळखतो. त्यांनाही कमी आयक्यूवाले लोक आवडतात. ते आज्ञाधारक लोकांना पसंत करतात. हीच त्यांची कमजोरी आहे. स्वतंत्र रुपाने काम करणारे लोक त्यांना आवडत नाहीत. मला त्यामुळेच दूर ठेवण्यात आले आहे, असे स्वामी म्हणाले.

सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी देखील मोदी सरकार वर जोरदार टीका केली होती. कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असून नितीन गडकरी यांच्याकडे कोरोनाचं नेतृत्व देण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी केली होती.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment