हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्वीटरवरील फॉलोअर्सची संख्या 60 मिलियन म्हणजे सहा कोटी झाली आहे. सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना 6 कोटी लोक ट्वीटरवर फॉलो करतात तर नरेंद्र मोदी 2354 जणांना फॉलो करतात. नरेंद्र मोदी यांची ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या गेल्या काही महिन्यात वेगाने वाढत आहे. सध्या मोदी जागतिक नेत्यांच्या टि्वटर फॉलोअर्सच्या संख्येनुसार तिसऱ्या स्थानावर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील अशा नेत्यांपैकी एक आहेत ज्यंना ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केलं जात आहे. नरेंद्र मोदी ट्विटरवर सर्वात आधी येणाऱ्या भारतीय नेत्यापैकी एक आहेत. नरेंद्र मोदी यांनी 2009 साली आपलं ट्विटर अकाऊंट सुरु केलं होतं.
Tweets by narendramodiगेल्यावर्षी सप्टेबर महिन्यात नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सच्या संख्येने पाच कोटींचा टप्पा पार केला होता. अशारीतीने नरेंद्र मोदी यांची फॉलोअर्सची संख्या अवघ्या 10 महिन्यात एक कोटीने वाढली आहे.
ट्विटरवरील फॉलोअर्सच्या बाबतीत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा अव्वल स्थानी आहेत. ओबामा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दुप्पट लोक फॉलो करतात. सध्या ओबामा यांचे 120.7 मिलियन म्हणजे जवळपास 12 कोटी फॉलोअर्स आहेत. यानंतर अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 83.7 मिलियन लोक फॉलो करतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.