शिर्डी | साई बाबा संस्थानाच्या वतीने होत असलेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीत दाखल झाले असून यावेळी त्यांनी साई बाबांचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानाच्या अभिप्राय पुस्तिकेत आपला अभिप्राय नोंदविला. त्यात मोदींनी नमूद केले की श्री साई बाबांच्या दर्शनाने मनाला असीम शांतता प्राप्त होते. श्री साई बाबांचा श्रद्धा आणि सबुरी चा संदेश संपूर्ण मानव जातीला प्रेरणा देणारा आहे. शिर्डी मध्ये सर्वधर्म समभावाचे एक अद्भुत रूप पाहायला मिळते. सगळ्याच पंथाचे लोकं साई बाबा चरणी नतमस्तक होतात. आजच्या जागतिक परिस्थितीत श्री साईबाबांचा महामंत्र ” सबका मलिक एक है ” हा संपूर्ण विश्वशांतीसाठी महत्वपूर्ण आहे. सर्व साई भक्तांना श्रीसाईबाबांचा आशीर्वाद प्राप्त हो, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो. हीच साईबाबा चरणी प्रार्थना करतो. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. परंतु यामध्ये साई संस्थानासाठी विशेष कुठल्याही देणगी किवां तस्याम गोष्टीचा उल्लेख त्यांनी यामध्ये केलेला नाही त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.