नरेंद्र मोदी हे रावणासारखे, ते मंदिरे…; भाजप खासदारनेच व्यक्त केला संताप

narendra modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रावणाशी तुलना केली होती. खर्गे यांच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता. पंतप्रधान मोदींनी खर्गे यांचे वक्तव्य संपूर्ण गुजरातचा अपमान असल्याचे म्हटले होते. मात्र आता भाजपचेच ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींची तुलना रावणाशी केली आहे. नरेंद्र मोदी स्वतःला धार्मिक असल्याचा दावा करतात पण ते मंदिरे नष्ट करत आहेत, मंदिरांवर कब्जा करत आहेत असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, मोदी हे स्वत:ला धार्मिक म्हणवणाऱ्या रावणासारखे आहेत, ते वाराणसी, उत्तराखंडमधील मंदिरे उद्ध्वस्त करत आहेत, त्यांच्यावर कब्जा करत आहेत. आता ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पवित्र पंढरपूर मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आम्हाला कळले आहे. त्यामुळे मी लवकरच मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण –

वारकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर येथे कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. वाराणसीच्या धर्तीवर हा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. पंढरपूर विकास आराखड्यामध्ये पहिल्यांदा मंदिराचा गाभा, मग मंदिर परिसराचा विकास केला जाणार आहे. परंतू, कॉरिडॉरला बाधित होणाऱ्या नागरिक व काही वारकरी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यात आता राजकीय क्षेत्रातून देखील विरोध सुरु झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांनी संताप व्यक्त केला आहे.