व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ओबीसी समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजपनं त्यांना तसं प्रोजेक्ट केलं. मोदी हे ओबीसी नाहीत आणि आम्ही ते आम्ही देशासमोर आणू असा इशाराही त्यांनी दिला. आज पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाने आडनावावरुन माहिती संग्रहित केली होती. मात्र आडनावावरुन जात समजत नाही. एकाच आडनावाचे लोक अनेक जातींमध्ये असू शकतात. त्यामुळेच मोदी हे ओबीसी नाहीत. ते गुजरातमधील श्रीमंत जातींपैकी आहेत. त्यासंदर्भातील सगळे पुरावेदेखील आमच्याकडे असून लवकरच आम्ही ते जनतेपुढे आणू, असंही नाना पटोले यांनी म्हंटल.

यावेळी त्यांनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेणारे सर्व मोदी आणि शहांचे हस्तक आहेत. त्यांना महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रातील तरुण जनतेचे काहीही देणेघेणे नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. ते आता महाराष्ट्राला गुजरातच्या पुढं नेण्याच्या गोष्टी करतायत असं म्हणत त्यांनी फडणवीसांवरही टीका केली.