जगातील सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदीच! ग्लोबल लीडर यादीत पटकवले अव्वल स्थान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वांचे लाडके नेते आहेत हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. परंतु वादाते जगभरात देखील सर्वांच्या आवडीचे नेते बनले आहेत. मॉर्निंग कन्सल्ट संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल यादीमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आले आहे. जगभरातील 22 प्रसिद्ध नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक 76% मते मिळाली आहेत. यातूनच ते जगात सर्वांचे लाडके पंतप्रधान आहेत हे सिद्ध झाले आहे.

मुख्य म्हणजे या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा देखील समावेश आहे. परंतु यातील कोणताही नेता टॉप पाच नेत्यांच्या यादीत आलेला नाही. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेज मॅन्युएल लोपेज ओब्राडोर (66% रेटिंग) आहेत.

तसेच तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लँडचे राष्ट्रपती अ‍ॅलन बर्सेट (58% रेटिंग), चौथ्या क्रमांकावर ब्राझीलचे राष्ट्रपती लूला डी सिल्वा हे (49% रेटिंग), तसेच पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज हे आहेत. सहाव्या क्रमांकावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे आहेत. मात्र या सगळ्यांना मागे टाकत नरेंद्र मोदी अव्वल स्थानी आल्यामुळे सध्या त्यांचीच चर्चा जगभरात सुरु आहे.