हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही महत्वाच्या सूचनाही केल्या. शंभर वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीविरुद्धचा भारताचा लढा आता तिसर्या वर्षात दाखल झाला आहे. ओमिक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहावे, असे मोदींनी म्हटले.
राज्यातील मुख्यमंत्र्यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीवेळी पंतप्रधानांसोबतच्या गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपली तयारी कोविडच्या सर्व प्रकारांपेक्षा पुढे असली पाहिजे. आपण ओमिक्रॉनवर विजय मिळवल्यानंतर, आपल्याला व्हायरसच्या इतर प्रकारांशी लढण्यासाठी देखील तयारी करावी लागेल. आणि यामध्ये राज्ये एकमेकांना सहकार्य करतील.
Speaking at meeting with the Chief Ministers. https://t.co/VDA7WeB7UA
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2022
ओमिक्रॉनचा प्रसार पूर्वीच्या प्रकारांपेक्षा वेगाने होत आहे, तो अधिक प्रसारित होत आहे. आपले आरोग्य तज्ञ परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत. स्पष्टपणे आम्ही सतर्क आहोत. राहावे लागेल. कठोर परिश्रम हाच आमचा एकमेव मार्ग आहे आणि विजय हाच एकमेव पर्याय आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.