हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधत आहेत.दिल्लीत शेतकरी आंदोलना दरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅली दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाष्य करत दु:ख व्यक्त केलं आहे. तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी देखील झाला. असं पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवलं.
The nation was shocked to witness the insult of the Tricolour on January 26: PM Narendra Modi at 'Mann Ki Baat' pic.twitter.com/xxXHS50fau
— ANI (@ANI) January 31, 2021
मोदी पुढे म्हणाले, आमचा लसीकरण कार्यक्रम हा ही जगात एक उदाहरण ठरत आहे. आज भारत जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवत आहे. आम्ही सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाबरोबरच जगात सर्वाधिक वेगानं आमच्या नागरिकांचं लसीकरणही करत आहोत. मेड इन इंडिया व्हॅक्सिन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असल्याचं ते म्हणाले.
तसेच आमच्या क्रिकेट संघानं सुरूवातीच्या अडचणींनंतर, शानदार पुनरागमन करत, ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका जिंकली. आमच्या खेळाडुंची कठोर मेहनत आणि सांघिक वृत्ती ही प्रेरित करणारी आहे.
यावेळी मोदींनी स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असल्याने यंदापासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू होत असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी देशावासियांनी शहिदांप्रती लिहिलेल्या भावना वाचून दाखवल्या. तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांबाबत संशोधन करून त्यांच्यावर लेख लिहिण्याचं आवाहन केलं. ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानावर दस्ताऐवज करण्यात येणार असून त्यासाठी लेख देण्याचं आवाहन त्यांनी केलं. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर त्याची माहिती देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’