हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण राज्यपाल व भाजपच्या वरिष्ठ नेते त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच तापले आहे. अशात आज खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हंटले आहे. अशात नरेंद्र मोदीच गोवा येथे येणार असून ते 11 डिसेंबर रोजी मोपा विमानतळाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.
गोवा राज्यातील झुआरी नदीवर मोठा असा पूल बांधण्यात आलेला आहे. या पुलाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. याचबरोबर अनेक कार्यक्रमांचे आयोजन गोवा सरकारच्या वतीने करण्यात आले. त्यामध्ये जागतिक आयुर्वेद काँग्रेसचा समारोप मोदींच्या दौऱ्यावेळीच होणार असल्याने या कार्यक्रमास मोदी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रात अनेक घडामोडीमुळे राजकीय वातावरण तापले असताना गोवा सरकारच्यावतीने मात्र अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या गोवा सरकारकडून कार्यक्रमाची तयारी व मोदींच्या दौऱ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.